कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत- मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर लाखरन येथे कार चालकाने वृद्ध महिलेला धडक दिल्याने अपघात झल्याची घटना घडली. या धडकेत महिला गंभीर जखमी होऊन तिचा मुत्यू झाला असून, कार चालक घटनास्थळावरुन आपल्या गाडीसह पसार झाला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रोडवर लाखरण येथे हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात वाहनाने रस्त्यावरून जात असलेल्या एका वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे फरार वाहनाचा शोध घेतला जात आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, महिलेला धडक देऊन अपघात करून पळून जाणाऱ्या वाहनाचा शोध पोलीस आणि स्थानिक घेत आहेत.







