जयंत पाटील, चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ
| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोहन धुमाळ यांच्या ज्ञानी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या भातगिरणीचा उद्घाटन सोहळा उद्या, रविवार दि. 15 नोव्हेंबर रोजी रामराज येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मा. आमदार जयंत पाटील आणि शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते भातगिरणीचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला परिसरातील नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






