| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनीतील भटवाडी-रिस येथील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत घरातील कपाटांमध्ये ठेवलेली रोख रक्कम व जुने मनगटी घड्याळ चोरीला गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घरमालक हे कुटुंबियांसोबत दि.6 ते 15 नोव्हेंबर दरम्यान कामानिमित्त बोहेर गेले होते. याच कालावधीत यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटांमध्ये ठेवलेली रोख रक्कम व जुने मनगटी घड्याळ त्यांनी चोरून नेले. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडी प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पंकज खंडागळे करीत आहेत.






