• Login
Friday, November 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चरीचा संप प्रेरणादायी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 27, 2026
in sliderhome, कार्यक्रम
0 0
0
चरीचा संप प्रेरणादायी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. नाना पाटील यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. चरीच्या ऐतिहासिक शेतकरी संपाच्या अनुषंगाने बाबासाहेब अनेकदा चरी येथे येत असत. त्यावेळी पेझारी येथील नाना पाटील यांच्या घरीही ते भेट देत होते. संविधानातील काही पाने बाबासाहेबांनी याच भूमीत लिहिल्याचा अभिमान आहे. बाबासाहेबांसह अनंत चित्रे, सुरबा टिपणीस यांसारख्या दिग्गजांची साथ नाना पाटील यांना लाभली. त्यांच्या सहकार्यामुळेच ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा पारित होण्यास मोठे बळ मिळाले. हा संप नव्या पिढीला स्फूर्ती देणारा आहे, असे गौरवोद्गार शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी काढले. ग्रुप ग्रामपंचायत चरी आयोजित चरी ऐतिहासिक संपाचा 93 वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (दि.27) चरी येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.



शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, सहचिटणीस नरेश म्हात्रे, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य पेझारी येथील अनिल पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते अनिल शांताराम पाटील, शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, माजी सरपंच निलम पाटील, पराग पाटील, सुधाकर पाटील, शंकरराव म्हसकर, गोरखनाथ पाटील, शिवराम महाबळे, प्रशांत पाटील, उदय पाटील, रविंद्र थळे, उमाकांत पाटील, सागर थळे, चंद्रकांत पिंगळे, सुरेश खोत, शरद वरसोलकर, निलेश खोत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते,चरी, कोपरी परिसरातील ग्रामस्थ, महिला, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की, शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकारातून चरी संपाच्या वर्धापन दिनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. पुढील पिढीला शेतकरी संपाचा इतिहास आणि पूर्वजांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्यांची माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा ऐतिहासिक सोहळ्यांचे आयोजन महत्त्वाचे आहे.



1932 मध्ये या शेतकरी लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. चरी-कोपर हे या संघर्षाचे केंद्र होते. शेतकरी ज्या जमिनी कसत होते, त्या जमिनीतील पिकाचा केवळ दोन आणे वाटा त्यांना मिळत होता. हा वाटा वाढवून मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र, सावकारांनी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकरी नेते आप्पासाहेब तथा नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभा राहिला. प्रदीर्घ काळ चाललेल्या या ऐतिहासिक संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनंत चित्रे आणि सुरबा टिपणीस यांसारख्या मान्यवरांची साथ लाभली. या संघर्षामुळेच ‘कसेल त्याची जमीन’ या कायद्याच्या निर्मितीला बळ मिळाले.


सर्वाधिक काळ चालणारा हा विक्रमी लढा होता. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनंत चित्रे, सुरबा टिपणीस सारख्या मोठ्या मंडळींची साथ नाना पाटील यांना मिळाली. त्यामुळे कसेल त्याची जमीन हा कायदा पारित झाला. या ऐतिहासिक लढ्याचे महत्व जगाच्या नकाशावर पोहचविण्याची गरज आहे. त्या पध्दतीने चरी या ठिकाणी सुविधांयुक्त स्मारक होणे गरजेचे आहे. यातून पर्यटन वाढीला चालना मिळण्यास मदत होईल. चरी खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीतील स्फुर्तीस्थान व वैभव आहे. हे वैभव आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. वेगवेगळ्या साधनांचा वापर करून चरीच्या संपाचा इतिहास प्रत्येक घटकाला समजला पाहिजे, अशा पध्दतीने काम करणे गरजेचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

सत्ताधाऱ्यांकडून इतिहास पुसण्याचा प्रयत्न
प्रदीर्घ काळ चाललेल्या चरीच्या शेतकरी संपाने इतिहासात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या ऐतिहासिक लढ्याचे महत्त्व अभ्यासाच्या माध्यमातून जगभर पाहेोचले पाहिजे. हा वारसा जतन करण्यासाठी आणि शेतकरी चळवळीचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शेतकरी टिकला पाहिजे आणि संघर्षाचा विचार जिवंत राहिला पाहिजे. आप्पासाहेब तथा नारायण नागू पाटील यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. मात्र, सत्ताधारी हा ऐतिहासिक वारसा पुसण्याचे काम करीत असल्याचे मत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करा
शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 1947 मध्ये झाली. चरी येथील शेतकरी संपाला केंद्रस्थानी ठेवून या पक्षाच्या विचारांची जडणघडण झाली. या विचारांचा उगम याच भूमीतून झाला, याचे समाधान आहे. पक्षाने आजवर संघर्षमय राजकारणातून वैचारिक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात अलिबाग आणि खारेपाटचे राजकीय व सामाजिक चित्र बदलणार आहे. या बदलत्या परिस्थितीत चरीच्या ऐतिहासिक संपाचा विचार आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
विविध उपक्रमांतून उलगडला चरी संपाचा इतिहास
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते चरी संपाच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शेतकरी नेते स्व. नारायण नागू पाटील आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. पराग पाटील निर्मित आणि सागर थळे यांनी सादर केलेल्या शेतकरी गीतातून चरी संपाचा इतिहास उलगडण्यात आला. तसेच पीएनपी कला विकास सांस्कृतिक मंडळाच्या वतीने राजन पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कला पथकाने चरी संपाचे नाट्यमय सादरीकरण केले. या विविध उपक्रमांतून ऐतिहासिक शेतकरी लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

Related

Tags: anil patilchari newschitralekha patilindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernaresh mhatrenewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial newssuresh gharatsuresh khaire
Previous Post

प्रदूषणाच्या विळख्यात नद्यांचा जीव गुदमरतोय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वैजाळीत अलिबागच्या तहसीलदारांचा विक्रम?
sliderhome

वैजाळीत अलिबागच्या तहसीलदारांचा विक्रम?

November 27, 2026
sliderhome

जिल्ह्यात संविधान दिन साजरा

November 26, 2026
अलिबाग-रोहा रस्ता अडकला वरिष्ठांच्या मार्गदर्शनात!
sliderhome

अलिबाग-रोहा रस्ता अडकला वरिष्ठांच्या मार्गदर्शनात!

November 26, 2026
रस्त्याच्या कामाने फोडली जलवाहिनी
sliderhome

रस्त्याच्या कामाने फोडली जलवाहिनी

November 26, 2026
जि.प.मध्ये प्रतिनियुक्तीचा बाजार!
sliderhome

जि.प.मध्ये प्रतिनियुक्तीचा बाजार!

November 26, 2026
एकनाथ शिंदेंकडून चवदार तळ्याची पाहणी
sliderhome

एकनाथ शिंदेंकडून चवदार तळ्याची पाहणी

November 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?