। तिबेट । वृत्तसंस्था ।
भारतीय सैन्याच्या जवानांचा सामना करणे लडाखमध्ये भयानक थंडीने थरथरणार्या चीनी सैनिकांना शक्य होणार नाही. त्याऐवजी चीनने आपली रोबो आर्मी आणि मानवरहित वाहने त्यांच्यासमोर उभी केली आहेत. तिबेटच्या कडाक्याच्या थंडीचा सामना करु न शकणार्या सैनिकांना वाचवण्यासाठी ड्रॅगनने हे काम केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनने तिबेट आणि लडाख सीमेवर डझनभर स्वयंचलित आणि रोबोटिक वाहने तैनात केली आहेत. भारतीय लष्कराशी नुकत्याच झालेल्या चकमकीत चिनी सैनिकांना थंडीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर हे उघड झाले की चिनी सैन्य बर्फाच्छादित भागात युद्धासाठी पूर्णपणे तयार नाही.
मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने तिबेटमध्ये 88 ऑटोमेटिक शार्प क्लॉ व्हीकल्स तैनात केली आहेत. यामध्ये लडाख सीमेवर 38 शार्प क्लॉ वाहने लडाख तैनात करण्यात आली आहेत. ही वाहने चिनी शस्त्रास्त्र उत्पादक कंपनी छजठखछउज ने बनवली आहेत. याचा उपयोग परिसराच्या निगराणीसाठी तसेच शस्त्रे आणि आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी केला जाईल.
चीनने तिबेटमध्ये ऑटोमेटिक र्चीश्रश-200 मानवरहित वाहनेही तैनात केली आहेत. अवघड भागात पाळत ठेवण्यासोबतच ही वाहने 50 किमीपर्यंत हल्ला करू शकतात. याशिवाय एकावेळी 200 किलोपेक्षा जास्त दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे यावरून वाहून नेली जाऊ शकतात. वायरलेसद्वारे नियंत्रित होणारी ही वाहने रोबोटप्रमाणे लढू शकतात. सध्या तिबेटमध्ये 120 र्चीश्रश-200ी आहेत, त्यापैकी बहुतांश भारतीय सीमेजवळ तैनात आहेत.