जिल्ह्यात 15 हजार 545 सक्रीय रुग्ण; जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यात सोमवार दि. 17 जानेवारी रोजी कोरोनाच्या 1 हजार 576 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1 हजार 877 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 हजार 545 सक्रीय रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोमवारी पनवेल महापालिका हद्दीत 996, पनवेल ग्रामीण 208, उरण 29, खालापूर 90, कर्जत 37, पेण 62, अलिबाग 60, मुरुड 9, माणगाव 17, रोहा 17, तळा 1, सुधागड 4, श्रीवर्धन 6, म्हसळा 1, पोलादपूर 1 तर महाड 38 असे 1 हजार 576 रुग्ण आढळले.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 98 हजार 141 झाली आहे. यापैकी 1 लाख 77 हजार 994 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 602 वर गेला आहे. सद्यस्थितीत 15 हजार 545 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.