। बोर्ली पंचतन । वार्ताहर ।
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील पोलीस चौकीचे नुतनीकरण करण्यात आले. निसर्ग चक्रीवादळात हरिहरेश्वर पोलीस चौकीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे येथील पोलीस कर्मचार्यांची गैरसोय होत होती. सदर चौकीच्या दुरुस्तीसाठी सरपंच अमित खोत, ग्रामपंचायत हरिहरेश्वर सदस्य व सामाजिक सर्व कार्यकर्ते यांनी एक पाऊल पुढे टाकत सदर चौकीची दुरुस्ती केली.
या कार्यक्रमा प्रसंगी श्रीवर्धनचे डिवायएसपी स्वामी, बाबर, श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी वर्ग, हरिहरेश्वर सरपंच अमित खोत, उपसरपंच विजय पाटील, सुबोध खोपटकर, सचिन गुरव, माजी उपसरपंच सुयोग लांगी, पोलीस पाटील, विनोद भोसले व नागरिक उपस्थित होते.