चौघांचा मृत्यू, 1 हजार 191 कोरोनामुक्त
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सोमवार दि. 31 जानेवारी रोजी कोरोनाच्या 326 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1 हजार 191 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सोमवारी पनवेल महापालिका हद्दीत 171, पनवेल ग्रामीण 43, उरण 6, खालापूर 24, कर्जत 3, पेण 43, अलिबाग 11, माणगाव 4, रोहा 9, सुधागड 1, श्रीवर्धन 4, म्हसळा 1 तर महाड 6 असे 326 रुग्ण आढळले. मुरुड, तळा, पोलादपूर या तीन तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 11 हजार 787 झाली आहे. यापैकी 2 लाख 2 हजार 894 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 649 वर गेला आहे. सद्यस्थितीत 4 हजार 244 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.