। खोपोली। प्रतिनिधी ।
खरीवली येथे आलेला अविनाश वाघ सकाळी जात असताना पुलावर संरक्षणकठडे नसल्याचा अंदाज न आल्याने पुलावरून दुचाकीसह कोसळल्याने जागीच मृत्यु झाला. 12 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुलावर संरक्षण कठडे नसल्यामुळे तरूणाला जीव गमवावा लागला असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी पीडब्ल्यूडी विरोधात संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अविनाश वाघ (खरबाची वाडी,वरसई) हा तरूण इंडोस स्पेस कंपनीत नोकरीला आहे. कंपनीतील मित्रांसमवेत खरीवली येथे पोपटीसाठी शुक्रवार दि.11 फेब्रुवारीला आला होता. यादरम्यान स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहचून मदतकार्य करण्याचे काम केले. खरीवली गावचा रस्ता अरूंद असल्यामुळे वाहने ये-जा करताना त्रास होत असून पुलावर संरक्षण कठडे नसल्यामुळे तरूणाला जीव गमवावा लागला असून पुलावर तातडीने संरक्षण कठडे बसविण्यासाची मागणी खरीवली येथील ग्रामस्थ,शेतकरी संघर्ष समितीचे शांताराम पाटील यांनी पीडब्ल्यूडीचे अभियंता परदेशी यांच्याकडे केली.