। अलिबाग । प्रतिनिधी ।
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे बुधवारी 30 मार्चला लोणेरे येथे येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 3 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरात इक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमिपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी 4.15 वाजता मेहता कॉमर्स कॉलेज, माणगाव येथे होणार्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.