जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात रविवार दि. 10 एप्रिल रोजी कोरोनाच्या एकही नव्या रुग्णाची नोंद झाली नसल्याने तसेच सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत 46 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 319 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 575 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर गेला आहे. सद्यस्थितीत 46 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.