। उरण । वार्ताहर ।
उरण येथे झोपडपट्टीतील गोरगरीब शिक्षित अशिक्षित स्त्रीयांना एकत्रित करून त्यांना स्वयंपूर्ण बनण्याच्या दृष्टीने सुमन तोगरे यांनी महिला बचत गटाची स्थापना केली व मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना सेवा सुविधा गोरगरिबांना मिळवून दिल्या. स्त्रियांमध्ये शिक्षण, अर्थ व सहकार विषयी जनजागृती केली. या कार्याची दखल घेत उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना आणि साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी यांच्या वतीने मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळ रायगडच्या अध्यक्ष सुमन तोगरे यांना सिंधुताई सकपाळ हिरकणी पुरस्काराने जालना येथे सन्मानित करण्यात आले.






