। पनवेल । प्रतिनिधी ।
काल पनवेल महानगर पालिकेची अर्थसंकल्पिय सभा पनवेलच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली या वेळी आपले अर्थसंकल्पिय निवेदन सादर करताना स्थायी समिती सभापती शत्रुघ्न काकडे यांनी देशाचे पंतप्रधान, गृह मंत्री, राज्याचे विरोधी पक्ष नेते आदींची नावे घेतली परंतु रायगड जिल्हाच्या पालकमंत्री कु अदितीताई तटकरे, खासदार अप्पासाहेब भारणे, तसेच कोकण शिक्षक आम बाळाराम पाटील यांची नावे न घेतल्याने पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे आक्रमक झाले आणि या बाबत तीव्र निषेध नोंदविला. त्यांच्या सोबत सर्वच विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले होते. या वेळी सभापतींना या बाबत विचारले असता त्यांनी हे आपले वयक्तिक मात असल्याचे सांगितले. या मुळे सभागृहात गोंधळ झाला होता.
स्थायी समिती सभापती हे संविधानातिक पद असून या पदावर असलेली व्यक्ती कोण्या एका पक्षाचा नसून तो संपूर्ण महानगरपालिकेचा असतो. नियमानुसार प्रथम अर्थसंकल्प हा स्थायी समिती मध्ये सादर केला जातो त्या वेळेस तो स्थायी समिती सदस्यांना दिला जातो. नंतर तो सर्वसाधारण सभेत सादर केला जातो.सर्व साधारण सभे अगोदर हा अर्थसंकल्प सर्व नगरसेवकाना दिला जातो जेणेकरून ते त्यावर अभ्यास करून आपली मते मांडतील. मात्र पनवेल महानगर पालिकेने तसे न करता काल सकाळी सभे मध्ये हा अर्थसंकल्प उर्वरित नगरसेवकांना दिला. मग आम्ही या वर अभ्यास केव्हा करणार आणि आमची मते केव्हा मांडणार असे सांगत. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करत सभात्याग केला.
त्या नंतर बहुमताच्या जोरावर पनवेल महानगर पालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी हा अर्थसंकल्प मंजूर केला.






