। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील राजेवाडी गावच्या रहिवासी असणार्या गंगाबाई लक्ष्मण करंजे यांचे शुक्रवार, दि.6 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या सामाजिक कार्यकर्ते तथा आदर्श शिक्षक करंजे गुरूजी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी रविवार, दि.15 मे रोजी, तर अंतिम धार्मिकविधी बुधवार, 18 मे रोजी निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडूंन देण्यात आली आहे.







