। उरण । वार्ताहर ।
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग रायगड व सेव्हन स्टार फुटबॉल अकॅडेमी उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उरण नगरपरिषद शाळेचे ग्राउंड येथे फुटबॉल ह्या खेळाचे निःशुल्क उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसियशन उरणचे संस्थापक महादेव घरत,राजू ठाकूर, रवींद्र नाईक ह्यांचा मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले. सेव्हेन स्टार फुटबॉल अकॅडेमीचे प्रवीण तोगरे, नंदिनी तोगरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पहिल्या दिवशी शिबीरला एकूण 35 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.







