। रेवदंडा । वार्ताहर ।
क्षात्रैक्य समाजाच्या वतीने 6, 7, 8 व 9 जानेवारी 2023 मध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या पुर्वतयारीच्या हेतूने नागाव वंखनाथ मंदिर येथे बुधवारी (दि.15) नागाव व आक्षी पंचक्रोशीतील शेतकरी व बागायतदारांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षात्रेक्य समाजाचे अध्यक्ष अविनाश राऊळ, व्दारकानाथ नाईक, नागाव ग्रा.प.सरपंच निखिल मयेकर, माजी सरपंच नंदु मयेकर, रसिका प्रधान,श्रीनाथ कवळे, रविद्र वर्तक, के.डी.पाटील, महेश कवळे, सुरेश घरत-कोटकर, एम.एन.पाटील, सुरेंद्र नागलेकर, निलेश नाईक, राजेंद्र नाईक, किशोर नाईक, मितेश ठाकूर, अजीत ठाकूर, सुनिल कवळे, विजय नाईक, सुभाष नाईक, समीर कवळे, शुभम नागलेकर, आदीने केले होते. यावेळी एकूण 275 जणांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली होती. कार्यक्रमात उपस्थित मान्यवराचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजक सुरेंद्र नागलेेकर यांनी केले. तर विनायक म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले.