• Login
Monday, June 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडातील दीपस्तंभ

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 7, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
आ. जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार नेमबाजी केंद्र भिंतीआड
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विठ्ठल सोळंके

पारख्यांनाही प्रश्‍न पडावा अशी काही रत्ने उपजत असतात. त्या रत्नांचा अभ्यास केल्यानंतर कुणाला ती अष्टपैलू, तर कुणाला अष्टशतपैलू भासू लागतात. महाराष्ट्र ही अशा अनेकविध रत्नांची खाणच आहे़ ज्या रायगडाने रयतेच्या राज्याचे स्वराज्य फुलविले, त्याच रायगडाच्या मातीत असेच एक रत्न 07 जुलै 1955 रोजी उपजले आणि स्वराज्याच्या विचारांचा वसा आणि वारसा जपत मोठे झाले, ते म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आदरणीय जयंतभाई पाटील यांचा उल्लेख करता येईल. ज्या शेतकरी, कामगार वर्गाच्या संपूर्ण जीवनात काबाडकष्टच असतात, अशा काबाडांच्या धन्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांच्याही जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत, त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी प्रयत्न करत असणार्‍या पक्षाचे ते नेतृत्व करतात आणि आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. असे म्हणतात की,
जिंदगी जिना आसान नही होता, बिना संघर्ष कोई महान नही होता, जबतक न पडे हथौडी की चोट, पत्थर भी कभी भगवान नही होता

याप्रमाणे संपूर्ण जीवनभर ऐशोआरामात जगता येईल एवढे ऐश्‍वर्य आणि समृद्धी असतानादेखील भाई शेतकरी कामगार वर्गाच्या हितासाठी संघर्ष करत आहेत. यांत्रिकीकरण, नागरीकरण व शासनाचे भांडवलदारधार्जिणे धोरण यामुळे शेतकरी, कामगार वर्गापुढील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कृषीविषयक बदलत्या परिस्थितीचा व पद्धतीचा दुरगामी परिणाम या वर्गाच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रतिष्ठा, पैसा आणि सत्ता मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे राजकारण, असा समज हाणून पाडत सत्ता कोणतीही असो, तिला आपल्या तालावर नाचविण्याचे काम भाई करु शकतात़ पण, प्रतिष्ठेचा आणि सत्तेतून पैसा उभारण्याचा प्रयत्न भाईंनी कधीच केला नाही. एक चांगले उद्योगपती असतानाही कामगारांच्या जीवनात आनंद यावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. नोकरशाहीकडून कामे करताना कोणतीही चिरीमिरी न देता, न घेता भाई नोकरदारांची मंत्रालयापर्यंतची शासकीय कामेही तेवढ्याच आस्थेने करीत असल्याने ग्रामस्तरापासून मंत्रालयापर्यंतच्या सर्व कर्मचार्‍यांनादेखील भाई आपले वाटतात. शब्द पाळणारा नेता म्हणून जनसामान्यांमध्ये भाईंची ओळख कायम आहे. सर्वांशी पोटास लावणे, हा जसा स्वराज्याचा जाहीरनामा होता, तसे अनेकविध उद्योगांतून रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठीदेखील भाईंची धडपड चालू आहे. उद्योगांसोबतच शिक्षणातूनदेखील समृद्धी येते, हा फुले-शाही-आंबेडकर यांच्या विचारांचा वसा घेऊन भाई शिक्षण संस्थांचे संचलनही उत्तम प्रकारे करतात.

शासनाचे विनाअनुदानाचे धोरण शिक्षक, कर्मचारी वर्गाचे जीवन उद्ध्वस्त करु पाहात असताना, संस्थेत नोकरी लावताना कोणतेही डोनेशन न घेता शासकीय अनुदान येईपर्यंत स्वत:च्या खिशातून शिक्षकांना पगार देणारे भाई महाराष्ट्रासाठी आधुनिक फुले आणि कर्मवीर आहेत, असेच म्हणावे लागेल. काही संस्था चालकांनी शैक्षणिक संस्थांना आपल्या उपजीविकेचे साधन बनविल्याबद्दल भाई आपल्या भाषणातून खंत व्यक्त करत. अशा संस्था चालकांवर कडक शब्दात हल्लाही चढवितात. स्वराज्याचे विचार लक्षात ठेवून रयतेच्या सुखासाठी प्रयत्नशील असणारा नेता म्हणूनदेखील आपणास भाईंकडे बघता येईल.

ज्येष्ठ साहित्यिक फ.मुं. शिंदेंनी शेतकरी कामगार यांच्या चळवळीचे विवेचन करताना आपल्या भाषणातून एकदा म्हटले आहे की, प्रचंड वैचारिक बळ घेऊन श्रमाची सार्थकता जोडण्यासाठी आंदोलने होतात, चळवळी उभ्या राहतात, भूमिकांचे स्फोट घडतात, चळवळींना हे नवीन नसले तरी नव्यानं पुन्हा पुन्हा काहीतरी नवीन घडणं चाललेलं असतं. या सर्वांचा केंद्रबिंदू माणूस असतो. इथं तो श्रमिक माणूस असतो, तो जिवंत असतो. जे जिवंत असतात, त्यांना त्यांच्या परीने जाणीव होत राहते. जाग येणे हेही जिवंत असण्याचे झोपेतही कळणारे वैशिष्ट्य आहे. चित्रदर्शी आणि चित्तनिद्रा यातला हाच तो फरक आहे. शेतकरी कामगारांचं जगणं चिरनिद्रेत ढकलून देण्याची कारस्थानं उलटून टाकण्यासाठी निद्रा त्यागून चित्तावर येणं गरजेचं असतं.

भाईंसारखी या विचाराने प्रेरित काही मोजकीच मंडळी आपल्या संवेदना जागृत ठेवून या शेतकरी कामगार वर्गाच्या प्रश्‍नांसाठी लढत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक व्यक्ती, पक्ष, संघटना जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी प्रयत्न करीत असताना भाई मात्र या जंजाळापासूनही दूर असल्याचे लक्षात येते. भाईंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊन वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट म्हणून भाईंकडे एवढीच माफक मागणी करु इच्छितो, की, भाईंनी आपल्या कार्याची, पक्षाची, चळवळीची, विचारांची जाणीवपूर्वक प्रसिद्धी करुन शेतकरी, कामगारांच्या प्रश्‍नांसाठी काम करणार्‍या कार्यकर्ते आणि नव्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी एखाद्या दीपस्तंभासारखे अखंड तेवत राहावे.

Related

Tags: alibagbhai jayant patilkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspwpraigadraigad politicsskp
Previous Post

सामर्थ्य सह्याद्रीचे, कर्तृत्व हिमालयाचे

Next Post

जिल्ह्यात 150 कोरोना रूग्ण; 209 कोरोना मुक्त एक मृत्यू

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला
sliderhome

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला

June 7, 2026
sliderhome

रिलायन्स कंपनीत चौघांचा गोंधळ

June 7, 2026
Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!
sliderhome

Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!

June 7, 2026
कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
कर्जत

कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

June 7, 2026
काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी
पर्यटन

काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी

June 7, 2026
किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी
कर्जत

किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी

June 7, 2026
Next Post

जिल्ह्यात 150 कोरोना रूग्ण; 209 कोरोना मुक्त एक मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?