| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील तसेच कलाकार भाऊ कदम यांच्या हस्ते कृषीवल हळदीकुंकू विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी आ. धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आरडीसीसी बँकेचे संचालक सुरेश खैरे, अस्लम राऊत, कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचलिका चित्रलेखा पाटील, मुख्य संपादक राजेंद्र साठे, डिजिटल आवृत्ती संपादक माधवी सावंत, वृत्तसंपादक भारत रांजणकर आदी उपस्थित होते.