मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्यावतीने प्रतिवर्षी कबड्डीमहर्षी स्व.बुवा साळवी यांचा जन्मदिन कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कबड्डीकरिता नेत्रदीपक व उल्लेखनीय कामगिरी व कार्य करणार्या खेळाडू, कार्यकर्ते, पंच, क्रीडा-पत्रकार यांना यंदा तीन वर्षाचे पुरस्कार एकत्रित जाहीर करून कोरोनामुळे राहिलेला अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न संघटनेकडून करण्यात आला आहे.
मीनानाथ धानजी(2019-20), शशिकांत राऊत(2020-21) या मुंबई शहरच्या कार्यकर्त्याबरोबर परभणीच्या भारत धनले(2021-22) यांना स्व.रमेश देवाडीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा श्रमयोगी कार्यकर्ता हा महत्वाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या संभाजी पाटील(2021-22), मुंबई शहरच्या सुधीर खानोलकर(2019-20) व डॉ.रत्नाकर गुट्टे-परभणी यांना कृतज्ञता पुरस्कार, तर पत्रकार म्हणून कोल्हापूरचे अजित पाटील(2019-20), जयेंद्र लोंढे(2020-21), विनायक राणे(2021-22) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई शहरच्या पंकज मोहितेची स्व.मधुसूदन पाटील, तर सातार्याची सोनाली हेळवीची स्व.अरुणा साटम 2019-20 यावर्षाच्या पुरस्कारासाठी, तर 2020-21 यावर्षाच्या स्व.मधुसुदन पाटील पुरस्काराकरिता ठाण्याच्या निलेश साळुंखेची आणि स्व.अरुणा साटम पुरस्काराकरिता मुंबई शहराची पूजा यादवची निवड करण्यात आली आहे. वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणार्या खेळाडूस स्व. मल्हारपंत बावचकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन 2019-20ची देण्यात येणारी शिष्यवृत्ती रत्नागिरीच्या शुभम शिंदे, मुंबई शहरच्या पौर्णिमा जेधे यांना, सन2020-21ची परभणीच्या निकिता लंगोटे हिला, तर सन 2021-22ची अहमदनगरच्या शंकर गदई व पुण्याच्या अंकिता जाधव यांना देण्यात येणार आहे. सन 2019 ला झालेल्या राज्य पंच परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सिंधुदुर्गच्या राजेश सिंगनाथ यांना स्व.वसंतराव कोलगावकर सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट स्पर्धा आयोजक जिल्हा म्हणून रत्नागिरी व चिपळूण तालुका कबड्डी असो.( 2019-20), परभणी जिल्हा कबड्डी असो. व साई सेवा क्रीडा मंडळ (2020-21), तर ठाणे जिल्हा कबड्डी असो. व हिंदवी युवा प्रतिष्ठाण(2021-22) यांना गौरविण्यात येणार आहे.
शिष्यवृत्ती म्हणून रोख रकमेचा धनादेश व पुष्पगुच्छ असे खेळाडूंच्या पुरस्काराचे स्वरूप असेल, तर इतर पुरस्कार्थीना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व अमृत कलश असे पुरकाराचे स्वरूप असेल. हे जाहीर झालेले पुरस्कार कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जन्मदिनी म्हणजे 15जुलै रोजी वितरित केले जातील. असे माहिती राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी एका पत्रकाद्वारे प्रसार माध्यमाना दिली.
इतर पुरस्कार पुढील प्रमाणे.
जेष्ठ कार्यकर्ता(2019-20):- 1)सुधीर पवार-रत्नागिरी, 2) शरद कालांगण-मुंबई शहर, 3)मधुकर राळेभात-अहमदनगर, 4) गोविंद देशपांडे-औरंगाबाद. सन 2020-21करिता:-1)दशरथ अनंत शिंदे-ठाणे, 2)सुरेश पाटील-जळगाव, 3)केशव पाटील-हिंगोली, 4)श्रीधरराव सूर्यवंशी-लातूर. सन2021-22 करिता :- 1)गजानन केशव म्हात्रे-रायगड, 2)दशरथ लांडगे-पुणे, 3)के.एस.शिंदे-परभणी, 4)दगडू चव्हाण-बीड.
जेष्ठ पंच (2019-20) :- 1)वसंतराव झेंडे-पुणे, 2)पांडुरंग पाटील-रायगड, 3)आप्पासाहेब लघाने-औरंगाबाद, 4)शशिकांत चव्हाण-मुंबई उपनगर. सन 2020-21 करिता:- 1)आत्माराम बैकर-रत्नागिरी, 2)चंद्रशेखर राणे-मुंबई शहर, 3)अलेक्झांडर मणी-जळगाव, 4)अजगर अली पटेल-नांदेड. सन 2021-22 करिता :- 1)भास्कर सपकाळ-ठाणे, 2)देवकर सिद्दप्पा गवळी-धुळे, 3)नवनाथ लोखंडे-हिंगोली, 4)लक्ष्मण भोसले-मुंबई शहर.
ज्येष्ठ खेळाडू (2019-20) :- 1)श्रीकृष्ण डोंगरे-ठाणे, 2)प्रदीप म्हात्रे-मुंबई उपनगर, 3)दिनेश हजारी-बीड, 4) विजया सावंत-पुणे. सन 2020-21 करिता 1)सुहास जोशी-पुणे, 2)विनायक लाड-मुंबई शहर, 3)शेख नजीब शेख जमाल अहमद-परभणी, 4)सौ. नीना प्रमोद गोळे(म्हात्रे)-ठाणे. सन 2021-22 करिता 1)विश्वास काटदरे-रत्नागिरी, 2)हौशीराम गोर्डे-अहमदनगर, 3)गोपीनाथ पाटील-रायगड, 4)रामनाथ शिंदे-औरंगाबाद, 5) उल्का लेले-महाजन-पुणे.