। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी, शिकावू परिचारिका यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षाविषयक शिबीर दि.12 जुलै रोजी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक जयपाल पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जयपाल पाटील यांनी घरातील गॅस, विजेची साधने सुरक्षितरित्या कशी हाताळावीत, मोबाईलचे धोके आणि सुरक्षा, विशेषत: महिला वर्गासाठी कोणताही आपत्तीजनक प्रसंग उद्भवल्यास महाराष्ट्र पोलिसांच्या 112 तर अपघात झाल्यास 108 रुग्णवाहिका व प्रसूतीसाठी 102 रुग्णवाहिका या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर आदी विषयांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास मेट्रन श्रीमती साळवी, थळे, मोकल, पाटील, बावरे, जोशी, राऊत, कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेट्रन नेहा चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन मेट्रन सिमा पाटील यांनी केले.