। मुरूड । प्रतिनिधी ।
मुरुड समुद्रकिनार्यावर दरवर्षी सालाबादप्रमाणे नित्य नियमाने ऑईल येण्याची सुरू आहे. दरवर्षी म्हणजे मे महिना व जुलै महिना अखेर समुद्रकिनार्यावर ऑईल येण्यास सुरुवात होते. यावर्षी जुलै महिन्यातही संपूर्ण समुद्र किनारी ऑईल आल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. दरवर्षी सुरक्षिततेच्या हेतूने पावसाळ्यात मच्छिमारांनी बोटी नेण्यास बंदी केली जाते. तसेच समुद्र किनारी जाण्यास पर्यटकांनाही परवानगी नसते. मात्र तरीही अनेकदा पर्यटक समुद्र किनारी फिरण्यासाठी येतात. अशावेळी समुद्र किनारी आलेल्या ऑईलमुळे त्यांचा हिरमोड होत असल्याची भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत प्रदुषण मंडळानेदेखील उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.