। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील वाशी येथील शांताबाई सुदाम भगत यांचे शनिवारी (दि.23) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 79 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन परिवाराचे सात्वंन केले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवारी (दि.1) महादेव मंदिर, तळाघर येथे तर उत्तरकार्य बुधवारी (दि.3) राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली.