खा. राजू शेट्टी यांचे जंगी स्वागत
| खोपोली | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा 2 ऑगस्ट रोजी वर्धापनदिन वडखळ येथे साजरा होत असताना, खोपोली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा. खासदार राजू शेट्टी यांचे जंगी स्वागत करीत शेकापक्षाने मोठे शक्तीप्रदर्शन केले.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास राजू शेट्टी जात असताना त्यांनी खोपोलीतील पदाधिकार्यांची भेट घेतली. याप्रसंगी राजू शेट्टी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी शेकापक्षाचे जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, तालुका चिटणीस संदीप पाटील, शहर चिटणीस अविनाश तावडे, व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष दिलीप पोरवाल, शहर खजिनदार जयंत पाठक, शामभाऊ कांबळे, रवींद्र रोकडे, कैलास गायकवाड, दिनेश गुरव यांच्यासह शेकापक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत खोपोली बाजारपेठेत चार चाकी वाहनांची रॅली काढीत जोरदार घोषणा देत खोपोली शहर दुमदुमून गेले होते.