। मुंबई । वृत्तसंस्था ।
आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट नारायण राणे यांनी आखल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला होता. याविरोधात आपण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारही केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या आरोपानंतर नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती.
केसरकर यांनी शुक्रवारी केलेल्या अनेक गौप्यस्फोटानंतर त्यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. किरण पावसकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.







