| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड येथील संजीवनी आरोग्य सेवा संस्थेच्या विविध उद्घाटन कार्यक्रमानिमित्त आलेले नेत्रचिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी डोंगरी येथील मठाधीपती त्रिशाताई दत्तात्रेय पाटील व डॉ. दत्तात्रय पाटील यांच्या स्वामी समर्थ मठास सदिच्छा भेट दिली.
मठाच्या परिसरात प्रवेश करताच परिसर सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन मानसिक समाधानाची प्रचिती येते. समाजसेवक, गोरगरिब जनतेला कायम मदतीचा हात देणार्या अशा दोन महान व्यक्तींची स्वामींच्या मठामध्ये भेट झाली, याचा मला आनंद आहे, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. मठात ईश्वरभक्तीसोबत शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम व उपासनेची सांगड कशी विविध ध्यानधारणा कार्यक्रमातून केली जाते, याबाबतची माहिती डॉ. लहानेंना त्रिशताईंनी दिली. याप्रसंगी विजय सुर्वे, अजित गुरव, कीर्ती शहा, आदेश दांडेकर आदी उपस्थित होते.