। पनवेल । वार्ताहर ।
बांधकाम चालू असलेल्या इमारतीवरून झोपेत चालत जाऊन एक इसम खाली पडून त्यात त्याचा दुर्दैवी मुत्यू झाल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहे. त्या इसमाचे नाव राजू चक्रवर्ती (अंदाजे वय 45 वर्षे), डोक्यावरील केस मध्यम काळे, नाक सरळ, दाढी मिशी काळ्या रंगाची बारीक, चेहरा उभट, रंग सावळा, उंची अंदाजे 5 फूट असून अंगात करड्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक दयानंद महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधावा.