। पनवेल । वार्ताहर ।
घरघुती किरकोळ वादविवाद झाल्याने एक विवाहित महिला मनात राग धरून राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
आंबू रामू मंडल, वय 22 वर्षे, राहणार कातकरवाडी, पनवेल, उंची 5 फूट, बांधा सडपातळ, वर्ण निम गोरा, चेहरा उभट, नाक सरळ केस काळे, नाकात मुरणी, अंगात नेसून पिवळ्या व गुलाबी रंगाचा मिक्स पंजाबी ड्रेस तसेच गुलाबी रंगाची ओढणी व पायात चॉकलेटी रंगाची चप्पल आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोईस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा पोना विष्णू गावडे यांच्याशी संपर्क साधावा.