। कोलाड । प्रतिनिधी ।
रोहा- कोलाड मार्गावर पाले बुद्रक गावचे हद्दीत इर्टिगा कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात 3 जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.31) दुपारी घडली. आदर्श नगर, भुवनेश्वर येथील कार चालक एम.एच .06 सीडी 1612 या कारने कोलाडकडून रोह्याच्या दिशेला भरधाव जात होता. यावेळी पाले बुद्रक गावाजवळ आले असता कार चालकाचा ताबा सुटल्याने त्याने समोरुन येणार्या एम.एच.47 एम 4881 या क्रमांकाच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकल चालकासह त्यांचे सहकारी जखमी झाले. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनी शुभाष जाधव यांच्या मार्ग दर्शानाखाली पोसई फडतरे अधिक तपास करीत आहेत.