| नागोठणे । वार्ताहर ।
शारदीय नवरात्रौत्सवास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहर व परिसरातील गावांमध्ये ज्या शांत पध्दतीने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शासनाच्या नियमावली नुसार शांततेत साजरा करावा असे प्रतिपादन नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन जगताप यांनी केले. सोमवार (दि. 19) रोजी शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य तसेच शहर व परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी नागोठणे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळूंखे, शांतता समितीच्या सदस्या अपर्णा सुटे, श्री जोगेश्वरी माता उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर, मंगेश शिरसे, प्रकाश ढोबळे, नामदेव वाघमारे, मनोज वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक सचिन निकम, पो.ह. विनोद पाटील यांच्यासह नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक यावेळी उपस्थित होते.