| गोवे-कोलाड | वार्ताहर |
खांब पुगावनजिक पडलेल्या भयानक खड्ड्यात एकाच दिवशी चार विचित्र आपघात घडले आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी दोघेजण गंभीर जखमी झालेले आहेत. रस्त्याच्या मधोमध पडलेला हा तीन फुटाहून अधिक खोलीचा खड्डा कोलाड कडून नागोठणेकडे जाणार्या वाहनांना मोठा त्रासदायक व जीवघेणा ठरत आहे तर जवळपास वीस ते बावीस फूट लांब पंधरा ते सोहळा फूट रुंद तर तीन फुटाहून अधिक खोलीचा असलेला हा खड्डा काही केल्या भरता भरत नाही तो थाथुर माथूर भरला की टिकत नाही सकाळी भरला की संध्याकाळपर्यंत जैसे थे ही अवस्था त्यामुळेे यावर संबधित अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गाने अधिक वेळ वाया न घालवता यावर ठोस उपाययोजना कराव्यात जेणेकरून नागरिकांचा प्रवास सुखकर होईल राज्याच्या सत्ता संघर्ष नाट्यात सारे गोंधळात गोंधळ सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत.







