| पनवेल । वार्ताहर ।
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खान्देश्वर येथे एका हुंडई कारची कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली मात्र कारचे मोठे नुकसान झाले. कर्नल इघ सक्सेना (वय 71वर्षे, रा. हडपसर पुणे) हे आपल्या ताब्यातील हुंडई कार क्रं चक 12ढछ 5381 घेऊन पुणे वरून मुंबईकडे जात असताना खान्देश्वर परिसरात त्यांचा गाडीवरील ताबा सुटून त्यांनी तिसर्या लेन वरून जाणारा कंटेनर क्र चक 46-ठ4520 ला पाठीमागून धडक दिली. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे पोलीस उपनिरिक्षक गणेश बुरुकुल आणि महामार्ग पळस्पे मोबाईलचे स्टाफ यांनी तात्काळ अपघाताच्या ठिकाणी जाऊन अपघातग्रस्त वाहन खाजगी क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत चालू केले.