| मुंबई । वृत्तसंस्था ।
बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शकीब अल हसन याने भारताला टी20 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले. पुढे तो म्हणाला की, बुधवारच्या सामन्यात टीम इंडियाविरुद्धचा सामना जिंकून गुणतालिकेत मोठा बदल करण्याचा प्रयत्न असेल. भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवार (दि.2) अॅडलेड ओव्हलवर एक रोमांचक सामना रंगणार आहे.
या सामन्यासाठी शाकिबने आपल्या संघाला अंडरडॉग म्हटले आणि म्हणाला, भारत फेव्हरेट आहे. ते येथे विश्वचषक जिंकण्यासाठी आले आहेत. जर आम्ही त्यांना हरवले तर ते त्यांच्यासाठी अपसेट असेल आणि आम्ही त्यांच्याविरुद्ध मोठा अपसेट करण्याचा प्रयत्न करू. आम्ही या सामन्यात फेव्हरेट म्हणून खेळणार नाही. त्यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांच्याकडे सर्व सामने जिंकून देणारे खेळाडू आहेत आणि त्यांना उपांत्य फेरीत जाण्यासाठी दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे.
भारताचा आतापर्यंत सुपर-12 टप्प्यात पाकिस्तान, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला आहे. टीम इंडियाने पाकिस्तान-नेदरलँडचा पराभव केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले आहे. बांगलादेशनेही या विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यात दोन जिंकले आहेत. बांगलादेशने नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेचा पराभव केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, त्यांचे दोन कठीण सामने म्हणजे भारत आणि पाकिस्तान अजून यायचे आहेत. टी20 विश्वचषक 2022 च्या गुणतालिकेत, भारत-बांगलादेश सध्या समान गुणांसह आहेत, दोघांच्या नेट-रन रेटमध्ये फरक आहे. अशा स्थितीत बांगलादेशने काही अपसेट केले तर टीम इंडियासाठी सेमीफायनलचा रस्ता कठीण होऊ शकतो.