खाली दिलेल्या माहितीवरून घरबसल्या मतदान ओळखपत्र डाउनलोड करा
। मुंबई । वृत्तसंस्था ।
दरमहिन्याला देशातील कोणत्यातरी भागात निवडणूक पार पडत असतेच. लवकरच महाराष्ट्रात देखील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुमच्याकडे वोटर आयडी कार्ड असणे गरजेचे आहे. वोटर आयडी कार्डचा वापर तुम्ही ओळखपत्र म्हणूनही करू शकता. तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसल्यास तुम्ही त्वरित बनवू शकता. तुमचे मतदान ओळखपत्र हरवले असल्यास अथवा सापडत नसल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही घरबसल्या सहज ओळखपत्र डाउनलोड करू शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.
पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाउनलोड करू शकता मतदान ओळखपत्र
मतदान ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला voterportal.eci.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला EPIC नंबर अथवा फार्म रेफरंस नंबर द्यावा लागेल. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका. पुढे Download E-Epic चा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा. आता तुमचे डिजिटल मतदान ओळखपत्र पीडीएफ फॉर्मेंटमध्ये डाउनलोड होईल.
मतदान ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
१. सर्वात प्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
२. त्यानंतर Form6 वर जाऊन Apply online for registration of new voter ID वर क्लिक करा.
३. New User वर क्लिक करून येथे तुमचे नाव, वय आणि लिंग इत्यादी माहिती नमूद करा.
४. आता पत्ता आणि इतर माहिती द्या.
५. पुढे तुम्हाला दोन लोकांची माहिती द्यावी लागेल, जे तुम्हाला व्हेरिफाय करू शकतील.
६. संपूर्ण माहिती दिल्यानंतर ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रं अपलोड करावी लागतील.
७. त्यानंतर तुमच्या फोन आणि रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक अॅप्लिकेशन नंबर मिळेल.
८. या नंबरचा वापर मतदान ओळखपत्राचे स्टेट्स चेक करण्यासाठी होईल.
संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता.
डुप्लिकेट मतदान ओळखपत्रासाठी द्यावी लागेल माहिती
यासाठी तुम्हाला https://www.nvsp.in/ वर जाऊन एक फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर सर्व कागदपत्रं अपलोड करा. तुम्हाला मतदान ओळखपत्र हरवल्यावर पोलिसात तक्रार करावी लागेल. त्यानंतर इतर कागदपत्रं व फॉर्म स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावी लागतील.