। खांब-रोहा । वार्ताहर ।
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्रमिक विद्यालय चिल्हे येथे इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले.
वा.ना. दांडेकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वा.ना. दांडेकर शिक्षक प्रशिक्षण केंद्र, ज्ञान प्रबोधिनी पुणे व एक्सेल उद्योग समूह, रोहा तसेच माध्यमिक मुख्याध्यापक संघ,रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन ज्ञान प्रबोधिनी मुख्य मार्गदर्शक ओंकार बाणाईत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आसावरी चंद्रचूड, वृषाली फणसळकर, प्रज्ञा पाटील, दीपक कांबळे, तालुका मुख्याध्यापक संघाचे नितीन गोरिवले, विनय मार्गे, दीपक जगताप, भागेश ढोले, दडवे, प्रसाद भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांसाठी इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षक मार्गदर्शन वर्गासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन शिबिरात गणित, भाषा, बुद्धिमत्ता आदी विषयांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक आसावरी चंद्रचूड, वृषाली फणसळकर, प्रज्ञा पाटील, ओंकार बाणाईत व दीपक कांबळे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.