| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर येथील तिरंगा पतपेढीचे सभासद तथा रंगकर्मी दत्तात्रेय चांगा खारपाटील यांना तिरंगा पतपेढीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी रंगकर्मी दत्तात्रेय खारपाटील यांच्या रंगभूमीवरील कार्याचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, तिरंगा पतपेढीच्या सभासदाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना तिरंगा पतपेढीकडून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
तिरंगा पतपेढीच्या या आर्थिक सहाय्य करण्याच्या निर्णयानुसार तिरंगा पतपेढीचे सभासद दत्तात्रेय चांगा खारपाटील यांचे वृद्धपकाळाने निधन झाल्यामुळे त्यांच्या वारसांना तिरंगा पतपेढीच्या वतीने रोख दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मात्र दत्तात्रेय खारपाटील यांचे वारसदार पुत्र सुबोध खारपाटील व किरण खारपाटील यांना तिरंगा पतपेढीकडून मिळालेली ही दहा हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांनी एखाद्या चांगल्या कामासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी चिरनेर तिरंगा पतपेढीचे चेअरमन अलंकार परदेशी, व्हाईस चेअरमन सुनील नारंगीकर, कमळाकर म्हात्रे, बापू मोकल, बी.सी. ठाकूर, रवींद्र म्हात्रे, सुधीर केणी, सुरेश म्हात्रे, घनश्याम पाटील, विकास म्हात्रे, बाळकृष्ण ठाकूर, प्रवीण म्हात्रे, कृष्णा कातकरी, उर्मिला ठाकूर, विद्या कारेकर, जगदीश ठाकूर, राजेंद्र भगत, चंद्रकांत गोंधळी तसेच अन्य उपस्थित होते.