कोट्यवधींच्या रोख रकमेसह गाडी, मोफत हवाई सफर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. त्याने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकत हे सुवर्णपदक मिळवलं. तब्बल 100 वर्षांत अॅथलेटिक्समध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक असल्याने नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून, यात रोख रकमेसह गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिमेंट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसे आहेत.
- बीसीसीआयकडून पुरस्कार – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नीरजला एक कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केल्याची माहिती सचिव जय शाह यांनी दिली. तर, चेन्नई सुपर किंग्सने नीरजला एक कोटी रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. तसेच त्याच्यासाठी 8758 नंबरची विशेष जर्सीदेखील तयार करणार आहे
- मोफत विमान प्रवास – इंडिगो एअरलाईन्सनेदेखील नीरजला एक वर्षापर्यंत मोफतमध्ये अनलिमिटेड विमान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. कंपनीने सांगितलं, की नीरज 7 ऑगस्ट 2022 पर्यंत आमच्या कंपनीच्या विमानाने हवा तितका मोफत प्रवास करु शकतो. या सर्वासोबतच गुरुग्राम येथील एका रिअल इस्टेट कंपनीने नीरजला 25 लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. याशिवाय बांगड सिमेंट कंपनीने घर बांधण्यासठी मोफत सिमेंटची घोषणादेखील केली आहे.
- महिंद्राकडून कार भेट – नीरज चोप्राला महिंद्रा ग्रुपतर्फे नुकतीच मार्केटमध्ये आलेली कार दणत700 देण्याची घोषणा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत केली.
- हरियाणा सरकाडून सहा कोटी – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं असून, सरकारच्या वतीने सहा कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसेच त्याला क्लास वन दर्जाची नोकरी आणि पंचकुलामध्ये अॅथलेटिक्स सेंटर ऑफ एक्सीलेन्सचा अध्यक्ष बनवण्याचंही जाहीर केलं आहे. पंजाब सरकारने देखील नीरजला बक्षीस जाहीर केलं असून मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.