| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती-2021 च्या लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या 3535 उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (2 एप्रिल) रोजी सकाळी 8:30 वाजता,अलिबाग येथील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये होणार आहे. यामध्ये जेएसएम, लॉ कॉलेज, कन्याशाळा, आरसीएफ, पीएनपी कॉलेज, होली चाईल्ड स्कुल, मराठी हायस्कुल वेश्वी, या आठ शाळा/महाविद्यालये यांचा समावेश आहे.
लेखी परीक्षेकरितापात्र ठरलेल्या 3535 उमेदवारांनी नमुद ठिकाणी सकाळी 6:30 वाजता महाआयटी विभागाकडील लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र, या कार्यालयाकडून दिलेले प्रवेश पत्र, ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना), 2 पासपोर्ट साईज फोटोसह परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. उमेदवार लेखी परीक्षेकरिता दिलेल्या दिनांकास गैरहजर राहिल्यास त्यांची लेखी परीक्षा परत घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. लेखी परीक्षेकरिता काळ्या शाईचे बॉल पेन कार्यालयाकडून पुरविण्यात येणार असल्याने उमेदवारांनी सोबत आणू नये. जर उमेदवारांना लेखी परीक्षेबाबत प्रवेश पत्र (Hall Ticket) प्राप्त झाले नाही, तर उमेदवारांनी कार्यालयाच्या sp.raigadmahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर कळवावे.