| खोपोली | वार्ताहर |
मौजे गोरठण बुद्रुक हद्दीत राकेश जाधव याच्या वीटभट्टी शेजारी एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता. त्या महिलेची ओळख पटविण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे.
पोलीस निरीक्षक बाळा कुंभार व त्यांच्या सहकार्यांनी सोशल मीडिया आणि अन्य मार्गाचा वापर करुन संबंधित महिलेच्या पतीला शोधून काढले आहे. घरगुती वादातून मनात राग धरून त्या महिलेने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत महिलेचे नाव पुनम सुरेश सिंग (वय 38) असे आहे.तिचा पती सुरेश सिंग हा शिरवली येथील उत्तम फूड कंपनीमध्ये कामाला होता आणि त्याच ठिकाणी हे कुटुंब कॉलनीमध्ये रहात होते.वारंवार पती-पत्नीचे कौटुंबिक वाद होत असत अशी माहिती त्यांच्या मुलांनी आणि मयत महिलेच्या भावांनी दिली.सदर महिलेचे प्रेत नातेवाईकांच्या हवाली केले असून शिरवली ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण झाले आहेत.






