तर संचालक पदी योगेश गडकरी यांची निवड
| मुंबई | प्रतिनिधी |
महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून अरविंद भादीकर यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी गुरुवारी आपला पदभार स्वीकारला आहे.
अमरावती येथील मूळचे रहिवासी असलेले भादीकर हे अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. झाले आहेत. मार्च-1992 साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे कनिष्ठ अभियंता म्हणून ते रुजू झाले.
महावितरणचे संचालक (वाणिज्य) म्हणून योगेश गडकरी यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. गुरुवारी त्यांनी संचालक (वाणिज्य) या पदाचा पदभार स्वीकारला आहे. नागपूर येथील मूळचे रहिवासी असलेले श्री. योगेश गडकरी यांनी अमरावती येथून अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (कॉम्पूटर इंजिनिअरिंग) केले आहे. एप्रिल 1994 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वर्धा येथे रुजू झाले. त्यांनी मुंबई मुख्यालयात विविध पदावर काम केले आहे. त्यांची पदोन्नती्द्वारे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) या पदावर नियुक्ती करण्यात आली.