मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यात आठवड्यातील दर मंगळवारी नियमन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत केले जाते. त्यामुळे असंख्य थंड पेय विक्रेते तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. राज्य शासनाकडून येत्या 72 तासात उष्णतेची लाट येणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे. सध्या मुरुड तालुक्याचे तापमान 36 डिग्री सेल्सियस च्या आसपास असून हे तापमान वाढणार आहे. यासाठी महावितरणने येणाऱ्या तीन दिवसात शेड डाऊन करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे शहरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन दुकानदार असोशिएशनचे अध्यक्ष जाहिद फकजी, प्रदीप बागडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दर्शन काळबेरे यांनी मुरुड महावितरणचे उप मुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर याना दिले आहे.