| रसायनी | वार्ताहर |
रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वाशिवली येथील एक 26 वर्षीय महिला कामावरून घरी परत जात असताना वाशीवली गावाजवळ चंदनकुमार या व्यक्तीने त्या महिलेचा एकांताचा फायदा घेऊन तिला पाठीमागून घट्ट पकडले. त्यावेळी त्या महिलेने त्याला विरोध करून आरडाओरड केला. त्यामुळे चंदनने तेथून पळ काढला. यासंदर्भात पीडित महिलेने रसायनी पोलीस ठाण्यात चंदनच्या विरोधात तक्रार केली असून, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.