माथेरानमधील हातरिक्षा चालकांची आर्त हाक
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये गेल्या काही महिन्यांत पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्याला प्रामुख्याने पर्यावरण पूरक ई-रिक्षा कारणीभूत ठरली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अमानवी प्रथा बंद करण्यासाठी हातरिक्षा चालकांसाठी पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालवण्याची परवानगी दिली होती. परंतु, आजही 74 हातरिक्षा चालकांकडून अमानवी प्रथा सुरू आहे. त्यामुळे ही प्रथा बंद करण्याची मागणी हातरिक्षाचालकांकडून केली जात आहे.
माथेरान मध्ये ई-रिक्षा चालू झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिक आणि वयोवृद्ध लोकांसाठी तसेच पर्यटकांसाठी त्याचा पुरेपूर फायदा होत आहे. परंतु, कुठेतरी हात रिक्षा ओढणारा वर्ग ई-रिक्षामुळे आजही स्वावलंबी झालेला नाही. गेले 40 गावातील नागरिक आणि पर्यटकांना दिवस रात्र सेवा देऊन पूर्ण आयुष्य हात रिक्षा ओढन्यात घालवले आहे. आज देखील हातरिक्षा ओढून आपल्या कुटुंबाच उदरनिर्वाह करत आहे. परंतु, ई-रिक्षा चालू झाल्यामुळे हात रिक्षा ओढणारा वर्ग बेरोजगार झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर व त्याचा कुटुंबावर उपासमार झाली आहे. या विषयावर त्यांना कोण न्याय देणार आहे की नाही, असा संतप्त सवाल त्यांच्यातून विचारला जात आहे. माथेरानमध्ये 94 परवाना धारक हातरिक्षा चालक आहेत. परंतु, केवळ 20 हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा चालवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आजही 74 हातरिक्षा चालक हे हात रिक्षामध्ये माणसांना बसवून त्या ओढत असल्याने ही प्रथा कधी बंद होणार, असा प्रश्न देखील रिक्षाचालक विचारत आहेत.