| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच नवीन पनवेलमध्ये झाली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मनीष सकलानी, पृथ्वेश मंडले, वैदे ठाकरे यांनी विशेष चमकदार कामगिरी केली. रसायनीतील मिस्तु केम प्लास्ट लि.चे व्यवस्थापकीय संचालक संजय डेढिया आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ याच्ंया संयुक्तविद्यमाने ही टेबल टेनिस स्पर्धा नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात रंगली. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेचे बक्षीस वितरण मिस्तु केम प्लास्ट लि.चे जनरल मॅनेजर एचआर आणि अॅडमिन किशार शेळके आणि मॅनेजर गोपीचंद पाल यांच्या हस्ते झाले. या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर, सचिव हेमंत वालकर उपस्थित होते. स्पर्धेचे चीफ रेफरी म्हणून डी. आर. साळसकर व पराग अंकोलेकर यांनी काम पाहिले.
गटनिहाय पदकविजेते
नवोदित :- मुली-रिया ठाकूर नवी मुंबई सुवर्ण, अनुष्का धामणकर नवी मुंबई रौप्य, श्रेया जानकर सीकेटी स्कूल नवीन पनवेल व आराध्या धेंडे नवी मुंबई कांस्य, मुले-यश थाटे नवी मुंबई सुवर्ण, श्लोक पाटील सीकेटी स्कूल नवीन पनवेल रौप्य, आयांश जैन नवी मुंबई व समर्थ कुटे नवी मुंबई कांस्य; 11 वर्षाखालील :- मुली-त्रिशा शेखर पावशे डीएव्ही पब्लिक स्कूल नवीन पनवेल सुवर्ण, आराध्या धेंडे नवी मुंबई रौप्य, मुले-नन्वीर सिंग नवी मुंबई सुवर्ण, अद्वीत गुप्ता डीपीएस स्कूल नेरूळ रौप्य; 13 वर्षाखालील :- मुली-आर्या दिघे मालवण जि. सिंधुदुर्ग सुवर्ण, अनन्या अजित मराठे डीएव्ही पब्लिक स्कूल नवीन पनवेल रौप्य, मुले-रेयांश शाहू नवी मुंबई सुवर्ण, कार्तिक ठाकरे नवी मुंबई रौप्य; 15 वर्षाखालील :- मुली-वैदेही ठाकरे नवी मुंबई सुवर्ण, किशीका धांडे डीएव्ही पब्लिक स्कूल खारघर रौप्य, मुले-हर्षद अनिल कुदाळे सेंट जोसेफ स्कूल नवीन पनवेल सुवर्ण, रेयांश शाहू नवी मुंबई रौप्य; 17 वर्षाखालील :- मुली- वैदेही ठाकरे नवी मुंबई सुवर्ण, किशीका धांडे डीएव्ही पब्लिक स्कूल खारघर रौप्य; मुले-इशांत वेंगुर्लेकर मालवण जि. सिंधुदुुर्ग सुवर्ण, हर्ष खत्री पेण रौप्य; 19 वर्षाखालील :- मुले-अनिशा अमरिश पात्रा डीएव्ही पब्लिक स्कूल खारघर सुवर्ण, विवेक पाल नवी मुंबई रौप्य; पुरुष एकेरी पृथ्वेश मंडले नवीन पनवेल सुवर्ण, मैत्रेय रौप्य; पुरुष दुहेरी :- पृथ्वेश मंडले व रिषब साळसकर नवीन पनवेल सुवर्ण, मनीश सकलानी व सर्वेश दहीबावकर नवी मुंबई रौप्य; वरिष्ठ गट पुरुष :- मनीश सकलानी नवी मुंबई सुवर्ण, पॉल डिमेलो नवी मुंबई रौप्य.