। ठाणे । प्रतिनिधी ।
उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या पथकाने बुधवारी (दि. 01) बांगलादेशी तरुणीला जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी डिसेंबरमध्ये सात बांगलादेशींना अटक केली आहे. खडे गोळवली येथे गंगाविहार कॉलनीत बांगलादेशी तरुणी वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी, सहायक पोलिस निरीक्षक बबन बांडे, हवालदार जाधव, सपकाळे, पाटील, शिपाई उगले, महिला पोलिस कुसुम शिंदे यांनी माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून कारवाई केली होती. यावेळी सलमा शेख (27) या तरुणीला ताब्यात घेतले आहे. ती बांगलादेशातील सलमा मुस्तफापूर येथील असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. सलमा ही पूर्वी मुंबई आणि सहा महिन्यांपासून खडे गोळवली येथे बेकायदेशीर वास्तव्य करून राहत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी सांगितले आहे.