| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मांडवा ते भाऊचा धक्का असा प्रवास करणारी रो-रो या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. मांडवा जेट्टीजवळ सोमवारी (दि.9) सकाळी मोठी घटना घडली. मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी असा प्रवास करणाऱ्या रो-रोमधून एका प्रवाशाने समुद्रात उडी मारली. या घटनेने चांगलीच खळबळ उडली असून त्या प्रवाशाचा शोध अद्यापपर्यंत लागला नसल्याची माहिती समोर येत आहे.
रो-रो सेवेसाठी ग्रीसहून आणलेल्या जहाजाची चाचणी यशस्वी झाली आहे. एकावेळी एक हजार प्रवासी आणि 200 गाड्या वाहून नेण्याची क्षमता या जहाजाची आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने 31 कोटी रुपये खर्च करुन या सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.
रो पॅक्स प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने मांडव्यात पायाभूत सुविधा विकसित केल्या. या कामांवर 135 कोटी खर्च झाले आहेत. मात्र अशा अपघातामुळे रो-रो सेवेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील आपल्या टीमसह मांडवा जेट्टीवर पोहचले असून माहिती घेत आहेत.