तळोजातील नाकाबंदीत सापडली दुचाकी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हवालदार डावकरे व शिपाई देवकते हे आरएएफ सिग्नल येथे वाहतुकीचे नियमन करीत होते. यावेळी पनवेलच्या दिशेने आलेल्या दुचाकीवरील चालक व त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीची हालचाल ही वाहतूक पोलिसांना संशयास्पद वाटली. यादरम्यान देवकाते व डावकारे यांनी त्या दुचाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या दुचाकी चालकासह मागे बसलेल्याने ती मोटारसायकल जागेवरच सोडून तेथून पळ काढला. वरिष्ठ अधिकारी यांना ही माहिती देऊन त्या दुचाकीची माहिती काढली असता या गाडीचा मूळ ओंकार गायकवाड हे असून ही दुचाकी चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर ओंकार गायकवाड यांना तळोजा येथे बोलावले व तळोजा पोलीस ठाण्यात ती दुचाकी पुढील कारवाईसाठी देण्यात आली. त्यामुळे चोरीला गेलेली दुचाकी सापडल्याने मालक गायकवाड यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले.

Exit mobile version