टायर फुटल्याने कार रस्त्याच्या खाली

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर गारपोली येथे उल्हासनगर येथील कारचा टायर फुटल्याने कार रस्त्याच्या खाली शेतात गेली.मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी या अपघातात झाली नाही. उल्हासनगर येथील एक व्यापारी रविवारी सकाळी कामानिमित्त खोपोली येथे आले होते. तो व्यापारी आपली टाटा कंपनीची कार घेऊन कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याने उल्हासनगरकडे जात होते.सायंकाळी सहाच्या सुमारास एमएच 05,इए 0564 ही कार गारपोली गावाच्या हद्दीतून जात असताना गाडीचा डाव्या बाजूच्या टायर फुटला आणि गाडी रस्त्याच्या खाली शेतात गेली.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही,गाडीचे चालक हे रस्त्याच्या खाली असलेल्या असलेल्या झाडावर अडकून गाडी आदळली आणि त्यामुळे गाडीचे चालक हे सुखरूप बाहेर आले.त्यावेळी तेथे असलेले उमरोली गावातील ग्रामस्थ यांनी आपल्या कडील ट्रॅक्टर आणला आणि गाडी शेतातून बाहेर काढून दिली.गारपोली,डिक्सल,उमरोली भागात असलेल्या रस्त्यात सतत अपघात होत असतात आणि त्यामुळे मार्च 2021 मध्ये रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले आणि त्यामुळे त्या कारचा टायर फुटून देखील मोठा अपघात झाला नाही.

Exit mobile version