विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा दाखल

। पनवेल । वार्ताहर ।

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात कुटुंबाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या महिलेने नवी मुंबई पोलीस दलाच्या महिला तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार दिल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

खारघर येथील सेक्टर 16 मधील सोसायटीत राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने याबाबत रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. एमबीए शिक्षण घेतल्यावर 2019 साली लग्न झाल्याचे सांगितले. पती, सासू-सासरे आणि नणंद हिने छळ केल्याचे तक्रारीत म्हटले. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत मोटार खरेदी करण्यासाठी माहेराहून पैसे, फसवणूक, अनैसर्गिक संबंधांसाठी आणि गर्भपात करण्यास दबाव, 56 तोळे सोने स्त्रीधनाचा स्वतःसाठी वापर, काही खासगी चित्रफीत जाहीर करण्याची भीती, पीडितेला आणि तिच्या मुलाला वाऱ्यावर सोडण्यात येणार असल्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. असे गंभीर आरोप महिलेने केले.

Exit mobile version