वाशीत पाळणाघरातील बालकाला मारहाण

| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील वाशीतील स्मार्ट थॉट्स डे केअर सेंटर या पाळणाघरातील 16 बाळाला थोबाडीत मारून उचलून बाजूला ढकलल्याचा क्रूर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाशी पोलीसमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार चिमुकला खुर्चीवर बसला आहे, तेवढ्यात टेबलावर त्याच्यासमोर खायचे ताट ठेवले जाते आणि बाळ त्या ताटातील चमचा घ्यायल जातो, त्याचवेळी त्याच्या थोबाडीत बसते आणि त्याला उचलून बाजूला केले जाते. हे बाळ रडत राहते. घरी आल्यावरदेखील बाळाचे रडणे थांबत नसल्याने सीसीटीव्ही तपासणी केल्यावर हा प्रकार समोर आला. दोन आठवड्यापासून हे बाळ रात्री झोपत नाही. सतत रडत असल्याने या बाळाला असेच मारले जात असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे.

पोलिसांनी प्रकरणी फक्त अदखल पात्र गुन्हा दाखल केला असल्याने या पाळणाघरातील इतर दिवसांचे सीसीटीव्हीदेखील तपासता आले नाहीत. पाळणाघर चालकाने पालकांनी तक्रार केल्यावर सीसीटीव्हीची मोबाईल लिंक बंद करण्यात आली. यामुळे याप्रकरणी एफआयआर दाखल झाली असती तर या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीअंती अजून काही बाबी समोर आल्या असत्या, अशी खंत पालकांनी व्यक्त केली याबाबत तपास सुरू आहे, एवढीच माहिती वाशी पोलिसांनी दिली.

Exit mobile version