मुरूड विश्रामबागेच्या नावामध्ये अपभ्रंश

उद्यान’ऐवजी ‘उदयान’ची शहरात चर्चा
| मुरूड | प्रतिनिधी |
मुरूड समुद्रकिनारी असलेल्या नगरपरिषदेच्या विश्रामबाग उद्यानाच्या नावामध्ये अपभ्रंश झाला आहे. उद्यान नावाऐवजी उदयान लिहिल्याने शहरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मुरूड समुद्रकिनारी विश्राम बागेत लहान मुलांसाठी असलेल्या उद्यानाची पार दुरवस्था झाली होती. वारंवार पत्रकारांनी दिलेल्या वृत्तानंतर नगरपरिषद प्रशासनाने या उद्यानात नवनवीन खेळणी व संपूर्ण दुरुस्ती तसेच निरनिराळी झाडे लावून नूतनीकरण केले आहे. परंतु, या उद्यानाचे काम पूर्ण झाल्यानंतर नामफलक लिहिताना नावामध्ये अपभ्रंश झाला आहे. तरी, मुरुड जंजिरा नगरपरिषदेने विश्राम बाग उद्यानाचा नामफलक सुधारुन उदयानऐवजी उद्यान करावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Exit mobile version